Sunday, 13 January 2019

:::::भांडण:::::

:::::भांडण:::::

देवा काय झाली दशा ही तुझ्या सुवर्ण धरतीची,
कधी भागवणार तहान तू या तळमळणाऱ्या मातीची !

का तुझ्या नजरा या निरागस जनतेचा अंत बघताय,
नाहि दिसत का तुला, या जगाचे पोशिंदे भुकेला मारुन जगताय !

अरे पोट कासुन जगताय तुझे लेकर, वाटत नाही का जराशी लाज,
काहीही म्हण देवा पण तुला तुझ्या देवपणाचा खुपच आलाय माज !

आमच्या खळखळणाऱ्या मनाचा आक्रोश नाही का तुझ्या कानी पोहोचतोय,
तू तर अंतरयामी आहेस ना, मग का अस मौन धरुन बसतोय !

नकोय रे आम्हाला सोनं-चांदी, नको हिरे-मोती,
फक्त पुन्हा बहरव दवबिंदुंनी, या सुकलेल्या गवताच्या पाती !

ही माणसं पण लय भोळी आहे रे, करतात धावा तुझ्या नसलेल्या देवपणाचा,
नाही कळत त्यांना, काळीज तुझ पाषाण आहे, आहेस देव तु दगडाचा !

अरे कस बघवत तुला कस सहन करतोस तुझ्याच दारी मरण तुझ्या भक्तांच,
भानावर आहेस का, तुझ्याच हाती तुझ्याच अंगणी रचल जातय सरण तुझ्या भक्तांच !

कोणी नाण्यावाचुन मरतोय तर कोणी पाण्यावचुन मरतोय,
मी तुलाच खोटं ठरवत नाहीय तर आम्ही पण चुकल्याच मान्य करतोय !

कोणी हसत हसत दु:ख सावरतोय तर कोणी अश्रूंच  ओझ या कोवळ्या पापण्यांमध्ये धरतोय,
कोणी संकटांना तोंड देऊन हसतोय तर कोणी त्यांना घाबरुन लाख मोलाचा जीव गमावुन बसतोय !

माफ कर देवा आज जरा जास्तच बोलुन गेलो,
तुझ्या देवपणाला माणुसकीच्या तराजूत तोलुन गेलो !

जाता-जाता फक्त एवढंच सांगुन जातो,

हार मानु एवढ्यातच अशातले नाही रे आम्ही,
प्रत्येक संकटावर मात करायला नेहमी तयार आहे !

कारण रक्त शेवटि तुझच आमच्यात, छाती आमची फौलादी अन् मनगटात जोर आहे !

थोडी साथ तू दे थोडा हातभार आम्हि देऊ,
मग बघतो कोणत्या संकटांची अन् कोणत्या दु:खांची आमच्या दारात येण्याची मजाल आहे !

- विशाल आडबाल
   9890300408

No comments:

Post a Comment

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...