Thursday 16 November 2017

:::::मैत्री:::::

:::::मैत्री:::::

कधी रुसणं
तर कधी हसणं
कधी भांडणं
तर कधी,
'यार सोड ना राग'
अस म्हणत मीठी मारणं

कधी मारणं
तर कधी शिव्या देणं
पण दुसऱ्या एखाद्याने
हात जरी लावला
तर त्याच्या कानाखाली आवाज काढणं

नाश्त्याला गेल्यावर
माझे पण पैसे भर
अस हक्कानं सांगणं
पण दवाखान्यात गेल्यावर
न सांगताच
आपल बील भरणं

सुखाच्या समारंभात
सहभागी व्हायला नाही जमल तरी,
दु:खाच्या वेळी
सारं काही सोडुन साथ देणं

कितीही राग असला चेहऱ्यावर
तरी मनात
द्वेष न ठेवणं
अन एकमेकांसाठी
काहिही करायला तयार होणं

ना जीव घेणं
ना जीव देणं
फक्त एकमेकांना
अपार जीव लावणं

यालाच तर म्हणतात
       "मैत्री"

-विशाल आडबाल

9890300408

3 comments:

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...