:::::वंदन आमुच्या शिवराया:::::
शिवराय असता वयाने लहान ,
त्यांना जिजाऊंची शिकवण ,
कराया कार्य महान ,
सुखी रयतेचे त्यांचे धोरण,
लावले स्वराज्या तोरण,
मावळ्यांना घेउनी सोबतीला ,
गड तोरणा त्यांनी जिंकला,
खंडण केले अन्याया ,
वंदन आमुच्या शिवराया //१//
मारीला अफजलखान ,
वाघ नखे घालून,
कुलकर्णी कृष्णा भास्कर,
चढविली शिवबांवर तलवार ,
वाटले ब्रह्महत्या पाप समजून,
शिवबा नाही मला मारणार ,
पण शिवबा झाले खबरदार,
जागेवर केले गद्दाराला ठार ,
सय्यद बंडा ने केला शिवबांवर वार ,
पण जीवाने केले त्याला ठार,
राजे तुम्हि लढले खुप लढाया,
वंदन आमुच्या शिवराया !!२!!
नाही केला कधीही जाती-धर्मभेद,
या पिढीला आहे तुमची गरज,
पण हे सांगताना वाटतो खुप खेद ,
तुमच्यासारखे राजे जन्माला येत नाही सहज ,
यावी युवा पिढीला ही समज,
अहो राजे तुम्हि लढले खुप लढाया,
वंदन आमुच्या शिवराया!!३!!
शिवराय आमुचे चरित्रवान,
आठवते त्यांची एक कहाणी,
एक मुसलमानाची सुन,
होती सुंदर आणि देखणी ,
त्या तरुणीला आई म्हणाले,
ऱाजे छत्रपती शिलवान,
मानत असे परस्त्री मातेसमान,
होती रयतेवर छत्रछाया ,
वंदन आमुच्या शिवराया!!४!!
अहो राजे तुम्ही नाही मानली कधी हार,
नाही केला कुणावरही पाठीमागूनी वार,
म्हणूनी जगात होतो तुमचा त्रिवार जयजयकार
ऱाजे तुमचा त्रिवार जयजयकार,
नेहमी वाटत असते मनाला ,
तुम्ही या पुन्हा जन्माला ,
राजे तुम्ही या पुन्हा जन्माला ,
ऱाजे तुम्ही लढले खुप लढाया,
वंदन आमुच्या शिवराया!!५!!
छत्रपती शिवराय कर्तृत्ववान,
कुळ्वाड्यांचे भूषण,
स्वराज्यात रयतेचा सन्मान,
एक झाले छत्रपती पुन्हा नाही होणार,
पण राजे करतो आम्ही निर्धार ,
तुमच्या प्रेरणेने घेउनि संस्कार,
हाती विचारांची तलवार ,
करु विद्रोहाचा एल्गार,
आम्हि स्वराज्य पुन्हा उभारणार,
शिवस्वराज्य पुन्हा उभारणार !!६!!
- विशाल आडबाल
9890300408
No comments:
Post a Comment