Tuesday 9 January 2018

:::::काळीज:::::

     :::::काळीज:::::

काळीज माझ-काळीज तुझ,
या काळजांच्या गुंत्यात गुंतलोय मी !
हा गुंता सोडवता सोडवता,
तुला माझ्या काळजातलच
सांगायला विसरलो मी !

तुझ्या काळजाच्या खोल गाभाऱ्यात
डोकावुन पहावस वाटत !
कुठे हरवलोय का.....?
मला शोधवस वाटतं !

ज्या दिवशी नाही दिसतेस तू, 
काळीज माझ रडु लागत !
अन तुझ्या एका नजरेसाठी,
हे वेड सैरा वैरा पळत सुटत !

कस सांगु मी...?
तुला आपलसं करण्यासाठी,
काळीज माझ किती धडपडत असत !
तू बघून करताच अनोळखी,
हे क्षणोक्षणी किती जळत असत!

सांग तरी सखे मला,
तुझ्या दगडायच्या काळजाला,
कधी पाझर फुटणार गं !
अन माझ्या प्रेमाच्या पान्ह्याची,
कधी घागर भरणार गं !

-विशाल आडबाल  
9890300408

4 comments:

  1. अप्रतिम कविता आणि खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. khup chhan kavita..... all the best for ur future......

    ReplyDelete

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...