Tuesday, 20 February 2018

:::::ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले:::::

:::::ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले:::::

हे माता साऊ
तुझे कसे मी गुण गाऊ !

तुजवाचून नसता मुलींना हक्क
शिक्षणाचा ,
त्यांच्या हक्कांसाठी सोसला तू मार दगड- धोंड्यांचा !

तू फोडीला अंधश्रद्धेचा पहाड ,
जाऊनी अज्ञानी रुढी परंपरेच्या पल्ल्याड !

माईसावित्री नसती जर तू ,
तर बहुजन हे शिकले नसते,

चुल आणि मुल, 

फक्त हेच मुलींचे आयुष्य बनले असते !

गोरगरीब - दलितांसाठी ठरलीस तु शिक्षण देवता,
नतमस्तक होतो तुझ्यापुढे मी अहंकारी ही आता !

उच्च-निच , भेदभावाच्या भिंतीला दिलास तु तडा ,
सगळ्यांच्याच अंगणात पडतोय आज एकात्मतेचा सडा !

जोतीबाच्या साथीनं जिंकलेस तू ,
तुझ्या अविश्वसनीय स्वप्नांना ,
शतशः नमन करतो ,
तुम्हा शिक्षणाच्या दात्यांना !

- विशाल आडबाल
9890300408

2 comments:

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...