:::::राजमाता जिजाऊ:::::
जय जय जिजाऊ राजमाता,
तुझ्या चरणी अर्पण हा जन्म,
सदा नमतो हा माथा !
तुझ्याविना नसता शिवबाच्या ही जन्माला अर्थ
तुच आई ,तुच शिक्षक
तुच शिवबाच सामर्थ्य !
तुझ्या दिव्यपराक्रमान राखली महाराष्ट्राची शान
तुझ्या संस्कारांनी घडविले राजे छत्रपती शिलवान !
मर्दानी तु आई या मावळ्यांची ,
तुझ्या विना नसती ,
स्थापना 'स्वराज्या'ची !
तु आईसाहेब सा-या मराठ्यांची ,
तुझ्या शब्दावर जान हाजिर ,
या मर्द मावळ्यांची !
आई तु त्या शिवबाची,
मोडीला अहंकार ज्याने मुगलांचा,
सदैव बाळगतो अभिमान
या महाराष्ट्राच्या मातीत जन्मल्याचा !
- विशाल आडबाल
9890300408
No comments:
Post a Comment