:::::नाद गं तुझा:::::
(Song)
नाद गं तुझा माझ्या जीवा लागला,
जीव माझा, माझा नाही तुझा होऊ लागला !
तुझ्याविना भासतया जग सार सुन-सुन,
सांग कधी मिळल छाया, फिटल सार-सार ऊन !
मनी माझ्या तुझचं ध्यान,
ओठी माझ्या फिरतया फकत तुझ-तुझ गाणं !
धरम तू माझा तू माझी जात झालीया,
दिस तू माझी रात झालीया,
अन नजरेशी तुझ्या माझी बात झालीया,
नाद गं तुझा माझ्या जीवा लागला,
जीव माझा, माझा नाही तुझा होऊ लागला !
तिरकी नजर तुझी होतो घायाळ मी,
हसणं तुझ मलम त्याच होऊ लागल,
खुललीया कळी जशी गुलाबाची मनामंधी,
मन माझ लाजू लागल अन बोलु लागल,
नाद गं तुझा माझ्या जीवा लागला,
जीव माझा, माझा नाही तुझा होऊ लागला !
तुझ्यासाठी जगतोया,
तुझ्यावरी मरतोया,
राज एक खोलतोया,
बोलु कसं सांग ना,
नाद गं तुझा माझ्या जीवा लागला,
जीव माझा, माझा नाही तुझा होऊ लागला !
-विशाल आडबाल
9890300408
No comments:
Post a Comment