::::: *Engineering Life* :::::
Class मधे शेवटच lecture चालु होत
पण मन माझ लागत नव्हत
समोर सर शिकवत होते पण लक्ष दुसरीकडेच होत
फक्त मीच उदास नव्हतो तर हे चित्र सगळीकडेच होत
सर पण म्हणाले शेवटच्या lecture चे शेवटचे 5 min राहिलेत
जणू 5 min साठी श्वास थांबला अन वाटल हे जिवनातले शेवटचे क्षण च उरलेत
या 5 मिनिटात मागील 4 वर्षातल सगळ काही आठवत होतो
दिवसा बघितलेली स्वप्न अन केलेली सगळी मज्जा या भिजलेल्या पापण्यांमधे साठवत होतो
Lecture ला आल्यापासुन ते college सुटेपर्यंतची मजा
Submission च्या काळात मिळालेली काळ्या पाण्याची सजा
Late आल की पहिल्या bench वर बसण्यासाठी सरांकडुन मिळालेली Order
मुला-मुलींना बसण्यासाठी केलेली Seperate Border
सरांची नजर चुकवुन केलेली ती chatting
back benches वर बसुन मित्रांसोबत केलेली ती जबरदस्त Fighting
सगळ काही संपणार होत
सगळ काही miss होणार होत
मित्रांसोबत केलेली मस्ती
गडाख canteen ची ती maggie tasty
Medha मधे केलेली ती भन्नाट मौज
Dance अन गाणं काही येत नसल तरी मित्रांच्या सोबतीने पुर्ण केलेली प्रत्येक हौस
माझ्या नजरेतुन "ती"च्या नजरेवर धरलेला तो नेम
अन "ती"च्या वर केलेल ते निरागस प्रेम
कट्ट्यावर केलेल्या त्या टिंगल्या अन उच्च level च्या गप्पा
चार जणांनी मिळुन खाल्लेला तो एक डब्बा
प्रत्येक अडचणीत मिळालेला तो मदतीचा हात
अन प्रत्येक सुख-दु:खात मिळालेली ती जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांची साथ
Exam form भरण्यासाठी उभा राहिलेलो ती line
अन form late झाला की भरलेला तो fine
Oral ला बसल्यावर External समोर केलेल ते विचार करण्याच नाटक
अन् Automatic केलेल ते द्रोणागिरी च फाटक
Project च्या कामासाठी केलेली ती भटकंती
अन Final sign साठी केलेली प्रत्येक सरांच्या cabeen ची भ्रमंती
Exam मधे pass होण्यासाठी केलेली अभ्यासाची Setting
अन All clear निघण्यासाठी केलेली Result ची waiting
रात्री Hostel वर चादर टाकुन घेतलेली कुणाची पडी
अन रात्रभर जागुन केलेला तो One Night Study
सगळ काही संपणार होत
सगळ काही miss होणार होत
सारं काही आठवत होत
ओठ तर बंद होते पण डोळ्यात पाणी मात्र साठत होत
Lecture ला बसा रे अस आता कुणी म्हणनार नव्हत
Aye I-Card घाल अस आता कुणी बजावणार नव्हत
75% Attendance ची कटकट आता संपणार होती
पण हृदय माझ दुखवून जाणार होती
Practical अन Lecture ला केलेली मजा आता पुन्हा करता येणार नव्हती
Exam Form ची ती line पण आता त्रास देणार नव्हती
Canteen ला बसुन मित्रांसोबत केलेली मजा आता पुन्हा होणार नव्हती
दररोज भरणारी मैफिल आता परत भरणार नव्हती
एवढ्यात सरांचा आवाज आला, Engg. चा निरोप घेण्याची वेळ झाली,
हे ऐकताच न कळत या डोळ्यांतून पाण्याची सर आली
कंठ दाटुन आला अन उर भरुन आला
भर उन्हाळ्यात माझ्या सुकावलेल्या डोळ्यांत अश्रूंचा पुर भरुन आला
ही Engg. पण ना फक्त Degree च नाही तर जगण ही शिकवुन गेली
या काही वर्षात कधीही न विसरण्यासारख्या आठवणी ही देऊन गेली
- विशाल आडबाल
9890300408
No comments:
Post a Comment