:::::ही पोरी:::::
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
*तो* - पिंपळाच्या पानावरती कोरलं तुझं नाव
मन झाल बेहाल तुझ्या नजरेचा घाव
*ती* - नको मारु पोरा तु फुकाचा रं ताव
लागायची नाही हाती फसल तुझा डाव
का माझा जीव तु जाळतीया
कशाला पुढ पुढ पळतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
*तो* - घनदाट केस तुझे जशी काळी माती
गोरं अंग डौले जशी गवताची पाती
*ती* - नको लागू मागे नाही येणार मी हाती
गडी मर्द हवा मला नको फुस्की छाती
कशाला अस तू बोलतीया
प्रेमाला माझ्या तू तोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
*तो* - उस फिका पोरी तुझे व्हट गोड गोड
बांधा तुझा जसा राणी रंभेला तोड
*ती* - धुण्यावाणी आपटीन तुला या नदीकाठाला
नको लागू पोरा तु आता माझ्या नादाला
कशाला रागात बघतीया
टाळुन नजर निघतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
*तो* - असा कसा झाला माझा पिरमाचा लोचा
राग तुझा जसा सखे मिरचीचा ठेचा
*ती* - कांदा नी भाकरीची जोड माझ्या मिरचीला
साधं सोप्पं नको समजु या खट्याळ वर्षीला
कशाला तोऱ्यात मिरतीया
उगाच हवेत फिरतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
*तो* - पेरणी झाली नात्याची खत त्याला प्रेमाचं
मनी मळा आंब्याचा नको रोप कारल्याचं
*ती* - भेटू दोघ बांधावरती निघते मी आता
मनी पिंजऱ्यात दे थारा या मैनेला
गोड गोड गोड गोड बोलतीया
प्रेमाच्या झुल्यात झुलतीया
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
छम छम छम छम चालतीया
गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया
ही पोरी.....
ही पोरी.....
नजरेन घायाळ करतीया
✒️गीतकार - विशाल आडबाल
8265091693