Thursday 5 November 2020

गीत

जाग आली स्वप्न तुटले रात सरली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली 

आई म्हणुनी जरी जळते सदा मी 
संसारी अंधार माझ्या भोगते सदा मी 

सुख-हर्ष इच्छा-नंद फक्त शब्द आहे 
पण बाईपणाशी याचा काय बंध आहे 

फुटले बांध आसवांचे स्वप्ने वाहीली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली 

नात्यांच्या या खेळामध्ये हार मानले मी 
अर्थशुन्य जगणं माझ हे जाणले मी 

दिनराती एकच वारा वाहे अंतरी 
जगणं हे मृत्यूसम घेते श्वास जरी 

अशा कशा विळख्यात मी घावली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली

मन बोले पाहु शब्द जिव्हा ही मुकी
कलियुगाच्या सितेवर ही कशी वेळ आली 

भिजायचे होते जिला स्नेह पावसाळी 
अग्निपरीक्षेची वर्षा तिच्यावरी झाली 

कशी नियती ही माझी वैरीन निघाली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली
हसण्याने या ओठांची साथ टाकली

वाटते सुगंध जरी फुल होऊनी
शब्द बोचती सर्वांचे काटे होऊनी 

आई-ताई बायको-माय माझे अंश आहे
नातीगोतीच्या सर्पाचा यांना दंश आहे 

कात मोहमायेची मी काय टाकली
हसण्याने या ओठांची साथ टाकली 

काळ्याभोर आभाळात तू चंद्र माझा 
तुझ्यासाठी जगायचे मला बाळा आता

दुनिया एक मायाजाळ गोष्ट ही खरी 
जगायचे आशेवरती जिवन तरी 

मृगजळापरी मजला सुख भासली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली

जाग आली स्वप्न तुटले रात सरली 
हसण्याने या ओठांची साथ टाकली

- विशाल आडबाल 
8265091693

No comments:

Post a Comment

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...