रात अंधारी माझ्या संसारी
सरणार कधी वणवण ही जीवाची
रात अंधारी माझ्या संसारी
सरणार कधी वणवण ही जीवाची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या दिव्याची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या दिव्याची
वाहीले आयुष्य मी लेकराच्या साठी
माझ्या नी दु:खाची या जन्माच्या गाठी
नाही अंत कधीही मन वेदनेला
नाही तक्रार कसली खोटे हसु ओठी
रात अंधारी माझ्या संसारी
सरणार कधी वणवण ही जीवाची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या दिव्याची
लाज कशाला मुडक्या संसाराची
गुन्हा कुंकुवाचा शिक्षा आयुष्याची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या जीवाची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या दिव्याची
रात अंधारी माझ्या संसारी
सरणार कधी वणवण ही जीवाची
देई प्रकाश परी हा सर्वांना
काळजी कुणाला जळत्या दिव्याची
- विशाल आडबाल
8265091693
No comments:
Post a Comment