:::::फरफट - शिर्षक गीत::::::
जगण्याची या कशी
झालिया घुसमट
संसाराची या सदा
वाटे भीती मज
खेळ हा दैवाचा
होई जिवाची रं फरफट
पाणी डोळ्यामंधी
हसती सदा ओठ
कशी माझ्या नशिबाची
अन जगण्याची ही गाठ
खेळ हा दैवाचा
होई जीवाची रं फरफट
चटके पदोपदी
या काळजाला
शिरावरी डोंगर गं
मुक्या वेदनेचा
नाही म्हणुनी किती
सोसु मी आता
भयंकर हा गुन्हा
"बाई" असण्याचा
रात्रीसम अंधार
संसारी माझ्या घनदाट
दाव सत्व तुझ
देवा कर नवी पहाट
सांग ना रे कधी
थांबेल ही फरफट
खेळ हा दैवाचा
होई जिवाची रं फरफट
- ©️®️✒विशाल आडबाल
8265091693
No comments:
Post a Comment