Monday, 11 December 2017

:::::माय-बाप:::::

:::::माय-बाप:::::

खूप अनुभव येतात
अपयश आल्यावर
नसत कुणी आपल
हे दिसत  वाईट  वेळेवर

माय-बापच देतात पाठींबा
साथ सगळ्यांनी सोडल्यावर
असतो विश्वास त्यांना
हा करेल मात अपयशावर

कुणी नसत रे कुणाच
जगतात सगळे स्वार्थावर
मैत्रीही असावी तर निस्वार्थी
नसावी ती फक्त पर्यायावर

माय-बापच देतात आशा
धीर आपण सोडल्यावर
दाखवतात ते योग्य दिशा
जीवनात आपण भरकटल्यावर

नाही होणार किंमत
मायच्या ममतेची अन
बापाच्या क्षमतेची
कळते किंमत त्यांची
ते या जगात नसल्यावर

- विशाल आडबाल
   9890300408

4 comments:

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...