Tuesday, 12 December 2017

:::::तो बाप असतो:::::

:::::तो बाप असतो:::::

मुलीच्या जन्मवेळी
सर्वात खुश असतो,
तो बाप असतो....

आपल दुःख मनात ठेवून साऱ्या घराला  आनंदी ठेवतो तो बाप असतो......

स्वतःच्या इच्छा मारून
मुलां-पत्निच्या इच्छा पुर्ण करतो,
तो बाप असतो......

स्वतः फाटके कपडे वापरून
मुलांना नवीन कपडे घेऊन देतो,
तो बाप असतो.......

ज्याच्या रागवण्यामध्ये
प्रेम दडलेल असत ,
तो बाप असतो......

मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघुन
त्याच सार दुःख विसरून जातो,
तो बाप असतो.....

स्वतःची परवाह न करता,
साऱ्या घराला सुखि ठेवण्यासाठी
पुर्ण आयुष्य झोकुन देतो ,
तो बाप असतो........

सार आयुष्य सेवा करून
त्याच ऋण फिटणार नाही,
असा तो बाप असतो....

- विशाल आडबाल
   9890300408

1 comment:

गीत

:::::ही पोरी::::: छम छम छम छम चालतीया  गुलु गुलु गुलु गुलु बोलतीया  ही पोरी..... ही पोरी..... नजरेन घायाळ करतीया  *तो* - पिंपळाच्या पानावरती...